top of page
Writer's pictureMahannewsonline

ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने २४ रुग्णांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे. कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.


कोरोना रुग्णांसह एकूण २४ उपचाराधीन रुग्णांचा ऑक्सिजन तुटवडा आणि इतर कारणांमुळे चमराजनगर जिल्हा रुग्णलायात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सध्या मृत्यूच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत,’ असं जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी चमराजनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर या घटनेची दखल घेऊन उद्या मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे.


bottom of page