top of page
Writer's pictureMahannewsonline

"एक प्रेमकथा"; करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं खासगी आयुष्य चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचं खासगी आयुष्य समोर येणार असे दिसत आहे. कारण ही तसंच आहे, धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी नुकतीच फेसबुक पोस्ट करत आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

“माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे,” अशी फेसबुक पोस्ट करत करुणा धनंजय मुंडे यांनी सोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक प्रेमकथा लवकरच असा उल्लेख असून खाली आश्चर्यजनक प्रेमकथा असंही लिहिण्यात आलेलं दिसत आहे..


धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच खुलासा करत, “तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत,” अशी कबुली दिली होती. त्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद मिटला होता. पण आता करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे


bottom of page