top of page
Writer's pictureMahannewsonline

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक; ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केली कारवाई

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला मुंबई एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीनं ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरापासून मुंबईतील ड्रग्ज रॅकेट आणि त्यामागे असणाऱ्या अनेक मोठ्या नावांची चौकशी एनसीबीकडून करण्यात आली आहे.

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीने अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कस्टडीची मागणी एनसीबी अधिकारी करतील.

दरम्यान, मुंबईत गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे.


bottom of page