top of page
Writer's pictureMahannewsonline

‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) मध्ये भाग घेणं रेल्वे अधिकाऱ्याला पडलं महागात…

छोट्या पडद्यावरील सर्वांचा आवडता लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला कार्यक्रमात हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं अनेकजण पाहतात. पण एका स्पर्धकांला हॉटसीटवर बसणं महागात पडले आहे.

‘कौन बनेगा करोडपती 13’च्या २६ आणि २७ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये कोटा (राजस्थान) येथे राहणारे रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे सहभागी झाले होते. त्यांनी १० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. या शोमध्ये पांडे यांनी 3 लाख 40 हजार रुपये जिंकले. मात्र ही रक्कम जिंकण्यापेक्षा या शोच्या निमित्तानं आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट-सीटवर बसून हा खेळ खेळता आला, याचा आनंद त्यांना झाला होता. पण त्यांचा हा आनंद काहीच काळ टिकला. कोटा येथे परतल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या वेतनवाढीवर तीन वर्षांसाठी बंदीही घातली आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोणतीही माहिती न देता गायब होणे आणि केबीसीमध्ये सहभागी होत असल्याची पूर्व कल्पना दिली नसल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. देशबंधू हे रजा मंजूर झाल्याशिवाय ९ ते १३ ऑगस्टपर्यंत बेपत्ता होते आणि त्यांचे असे वागणे कामाकडे दुर्लक्ष करण्यासारखे असल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.


रेल्वे प्रशासनाद्वारे केलेल्या या कारवाईला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. या प्रकरणी देशबंधू पांडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


bottom of page