top of page
Writer's pictureMahannewsonline

केजरीवाल भाजपाची बी टीम; आम आदमी पक्षात जाणं आपली मोठी राजकीय चूक : सुखपालसिंग खैरा

पंजाबमधील आपचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांच्यासोबत आमदार जगदेव सिंग कमलू आणि पिरमल सिंग खालसा यांनीदेखील पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सुखपाल सिंग यांनी आम आदमी पक्षात जाणं आपली खूप मोठी राजकीय चूक असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. अरविंद केजरीवाल हुकूमशाह असून आसएसएस भाजपाची बी टीम असल्याचं सुखपाल सिंग यांनी म्हटलं आहे.

२०१५ मध्ये आपण आपमध्य प्रवेश करणं खूप मोठी राजकीय चूक होती. केजरीवाल भारताच्या राजकारणात गुणात्मक बदल आणतील अशी आपल्याला अपेक्षा होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. “पण सोबत काम केल्यानंतर अरविंद केजरीवाल दुटप्पी आणि ढोंगी असल्याचं लक्षात आलं,” असा गंभीर आरोप सुखपाल सिंग यांनी केला आहे.

“अरविंद केजरीवाल यांनी जम्मू आणि काश्मीरला नष्ट करण्यासाठी भाजपाला मदत केली असून ते नेहमीच संघराज्यवादाविरोधात काम करतात. त्यांची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता त्यांनी दाखवून दिले असल्याचं सुखपाल सिंग यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या तीन आमदारांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळ मिळेल अशी अपेक्षा अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केली आहे.


bottom of page