top of page
Writer's pictureMahannewsonline

सत्तांतराची परंपरा मतदारांनी काढली मोडीत

केरळ विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सत्तांतराची परंपरा मतदारांनी मोडीत काढत एलडीएफकडे दुसऱ्यांदा राज्याची सत्ता सोपवली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पसंती देत मतदारांनी भरघोस मतदान टाकल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे.

मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षाला सत्तांतर होतं आलं आहे. चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच सलग दुसरा विजय मिळवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं आहे. राज्यातील निकालांचं चित्र जवळपास आता स्पष्ट झालं असून लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट ९३ जागांवर तर युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट ४४ जागांवर आघाडीवर आहेत.


bottom of page