top of page
Writer's pictureMahannewsonline

केव्हिन पीटरसनचे ‘हिंदी’ ट्वीट व्हायरल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात चिंतेची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बीसीसीआयला आयपीएलचा १४वा हंगामही स्थगित करावा लागला. त्यानंतर या स्पर्धेत खेळणारे खेळाडू आणि इतर सदस्य त्यांच्या मायदेशी परतले आहे.मायदेशी परतल्यानंतर आयपीएलमध्ये समालोचन करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने भारताच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. थेट हिंदीतून ट्वीट करत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्याचे हे ट्विट काही तासातच व्हायरल झाले.

”मी भारत सोडला असला, तरीही मी या देशाचा विचार करीत आहे. कारण या देशाने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. कृपया सुरक्षित राहा. ही वेळ निघून जाईल, परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे.”असं पीटरसनने ट्विटमध्ये म्हंटलं आहे. भारतीयांनीही त्याच्या ट्विटला भरभरून प्रतिसाद देत कंमेंटचा पाऊस पाडला.


bottom of page