top of page
Writer's pictureMahannewsonline

केएल राहुलकडून अखेर प्रेमाची कबुली...

टी-२० वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध काल झालेल्या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलने १८ चेंडूत धमाकेदार अर्धशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ५ नोव्हेंबर हा दिवस राहुल साठी महत्वाचा होता. सामना संपल्यानंतरही राहुलने असे काही केले की सर्वजण राहुलने सामना संपल्यानंतर फेसबुकवर एक फोटो पोस्ट करत अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राहुलने अथियासोबतचा फोटो "Happy birthday my ❤️ Athiya Shetty" या कॅप्शनसह पोस्ट करत अथियासोबतचे नाते जगासमोर आणले.

गेल्या काही दिवसांपासून अथिया राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते सतत एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांचा इंग्लंडमध्ये फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता. पण त्या दोघांनीही उघडपणे यावर वक्तव्य केलेले नव्हते. पण आता राहुलने फेसबुक पोस्ट करत अखेर प्रेमाची कबुली दिली.

स्कॉटलंडविरुद्ध काल झालेल्या सामन्याला अभिनेत्री अथिया शेट्टी हिने हजेरी लावली होती. अथियाने सामन्यादरम्यान राहुलला चिअर केले. ५ नोव्हेंबर हा अथियाचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्याने आपल्या अर्धशतकी खेळीने अथियाला खास गिफ्ट दिले.


bottom of page