top of page

कोकण रेल्वे मार्गावर दहा नवे क्रॉसिंग स्थानके

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेळ वाचण्यासाठी, नवीन गाडय़ा सेवेत याव्या यासाठी कोकण रेल्वेने क्रॉसिंग स्थानक प्रकल्प राबविला होता. हा प्रकल्प मार्च अखेरीस पूर्ण झाल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.

या प्रकल्पांर्तगत कोकण रेल्वे मार्गावर इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कळबनी, कडवई, वेरावली, खारेपाटण, आर्चिणे, मिरजन, इनजे या दहा नव्या क्रॉसिंग स्थानकांची भर पडली आहे. त्यामुळे कोकणवासियांना दिलासा मिळाला आहे.

कोकण रेल्वेवरुन प्रत्यक्षात कोकण आणि त्यामार्गे जाणाऱ्या गाडय़ांची संख्या जास्त आहे. याशिवाय मालवाहतूकही मोठय़ा प्रमाणात होते. सध्या वीर ते रोहा अशा ४६ किलोमीटर मार्गाचेच दुहेरीकरण झाले आहे. सुट्टीच्या वेळी आणि गर्दीच्या काळात जादा गाड्या सोडल्यावर कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे कोकण रेल्वेवर झालेल्या क्रॉसिंग स्थानक प्रकल्पामुळे रेल्वेला आणि प्रवाशांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.



bottom of page