top of page
Writer's pictureMahannewsonline

कोल्हापुरात रेल्वेच्या डब्याला भीषण आग ; जीवितहानी नाही, पण...

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजर्षी शाहू रेल्वे स्थानकातील न्यू इंजिन लाईन पार्किंग यार्डमधील मोकळ्या रेल्वेच्या डब्याला आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे डबा जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग अचानक लागली असून याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पार्किंग यार्डमधील एका डब्याला आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. रेल्वे स्थानकात धुराचे लोट दिसू लागले अन् पाहता पाहता काही मिनिटांतच रेल्वेचा डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तीन तासाच्या परिश्रमानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत पूर्ण डबा जळून खाक झाला. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही.


bottom of page