top of page
Writer's pictureMahannewsonline

कंगना आणि रंगोलीविरोधात फसवणूक आणि कॉपीराइट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

कॉपीराइट नियमांचे उल्लंघन, विश्वासघात आणि फसवणूक केल्याच्या आरोपांअंतर्गत अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कंगना आणि रंगोलीसोबतच या प्रकरणामध्ये कुमार जैन आणि अक्षय रणौत या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीरचे लेखक आशीष कौल यांनी आपल्या पुस्तकाची कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरुन पाठवली होती. त्यानंतर काही दिवसांनी याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा कंगनाने ट्विटरवरुन केली. मात्र ही घोषणा करण्यापूर्वी कंगनाने या कथेचे मूळ लेखक असणाऱ्या कौल यांची परवानगी घेतली नव्हती.त्यानंतर कौल यांनी वांद्रे येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी कंगनाबरोबरच तिची बहीण रंगोली, कमल कुमार जैन आणि अक्षय रणौत या तिघांच्या नावांचाही उल्लेख आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सर्व गोष्टीची पडताळणी करुन मुंबई पोलिसांना या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.


न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आयपीसी ४०६,४१५,४१८,३४,१२०(ब) आणि कॉपीराइट कायद्याअंतर्गत ५१,६३ आणि ६६ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लवकरच चौघांविरोधात समन्स काढून त्यांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात येणार असल्याचे समजते .

bottom of page