top of page
Writer's pictureMahannewsonline

VIDEO व्हायरल ... अन् भाजप महासचिवाचा राजीनामा

चेन्नई - तामिळनाडू भाजपचे महासचिव केटी राघवन यांनी युट्यूबवर स्टिंग व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. भाजपचे नेते मदन रविचंद्रन यांनी हा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे. दरम्यान, केटी राघवन यांनी याच्याशी आपला काही संबंध नाही असं म्हणत कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला आहे.

केटी राघवन यांनी ट्विट करत स्वत:वरचे आरोप फेटाळून लावताना न्यायाचा विजय होईल असं म्हटलं आहे. तामिळनाडुतील नागरिक आणि पक्ष कार्यकर्ते जे माझ्यासोबत आहेत त्यांना माहिती आहे मी कोण आहे. गेल्या 30 वर्षांपासून कोणताही फायदा न पाहता काम करत आहे. आज सकाळी मला सोशल मीडियावरून एका व्हिडिओबाबत समजले. माझी आणि पक्षाची प्रतिमा खराब करण्यासाठी हे करण्यात येत आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर पदाचा राजीनामा देत आहे.' असं राघवन यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

दरम्यान रविचंद्रन यांनी त्यांच्या टीमकडे असे 12 नेत्यांचे ऑड़िओ क्लिप आणि व्हिडिओ फूटेज असल्याचा दावा करत येत्या काही दिवसांमध्ये हे व्हिडिओ समोर आणले जातील, असे सांगितले. भाजप नेत्यांकडून लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने शरीरसंबंधांच्या आरोपनांतर अशा स्टिंग ऑपरेशनची कल्पना सुचल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा हेतू असल्याचंही ते म्हणाले.



bottom of page