top of page
Writer's pictureMahannewsonline

घरबसल्या घ्या ‘लालबागचा राजा’चं लाईव्ह दर्शन

भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या ‘लालबागचा राजा’चं मोहक रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आणि फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी असंख्य गणेशभक्त तासंतास रांगेत उभे असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव देखील शासन निर्णयानुसारच होणार आहे. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने गणेश भक्तांसाठी मंडळाने घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे. ‘लालबागचा राजा’चं लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे.

यंदाही गणेशभक्तांना ‘लालबागचा राजा’चं प्रत्यक्ष दर्शन घेण्यास मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. त्याचसोबत, आरतीच्या वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. यावेळी मंडळानेही सर्व नियमांचं पालन करण्याचं आश्वासन दिलं आहे.


bottom of page