top of page

लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा

माजी केंद्रीय मंत्री तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने भ्रष्टाचाराच्या नव्या प्रकरणात शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी एकूण १७ ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. ही ठिकाणे लालूप्रसाद, त्यांचे कुटुंबीय आणि मुलगी मिसा भारती यांच्याशी संबंधित आहेत. दिल्ली, पाटणा आणि गोपालगंज येथे ही शोधमोहीम सुरू आहे.

लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या बदल्यात संबंधितांकडून भूखंड मिळविले.लालू यादव यांची काही दिवसांपूर्वीच बिरसा मुंडा तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. १० लाखांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांना हा जामीन मिळाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर हा नविन गुन्हा दाखल झाला त्यामुळे आता लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


bottom of page