top of page
Writer's pictureMahannewsonline

तुझे जनतेवर प्रेम आहे हे मान्य, पण...

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एक हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. सध्या त्यांचा मुक्काम मुक्काम याच कोविड केअर सेंटरममध्येच आहे. लंके स्वत:या केंद्रात पूर्णवेळ थांबून रुग्णांची सेवा करताना दिसून येत आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लंके यांचे कौतुक केले. मात्र काळजी घेत नसल्याबद्दल लंके यांना चांगलेच सुनावले. ‘रूग्णांची सेवा करतोय यात आनंद आहे, मात्र सामाजिक अंतर, मास्क, ग्लोज, सॅनिटायजर आदींच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्याकडे लक्ष देत जा. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. तुझे जनतेवर प्रेम आहे हे मान्य, मात्र त्यांची काळजी घेताना तुझीही काळजी घे. काही मदत लागणार असेल तर सांग,’ असेही पवार म्हणाले.

आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने सुरू केलेल्या या कोविड केंद्रासाठी देशविदेशातून मदत येत आहे. लंकेच्या उपक्रमांचे तसेच त्यांच्या या कामाचे कौतुक होत होताना दिसत आहे. त्यासंबंधीची बातमी आज सकाळी अजित पवार यांनी पाहिली आणि ते काहीसे रागावले. अजित पवार यांनी निलेश लंके यांना फोन लावून त्यांच्या कामाचे कौतुक केले. परंतु, मास्क किंवा सुरक्षित अंतराचा कोणताही नियम न पाळता काम करणाऱ्या लंकेंना ‘काम चांगले आहे, ते सुरू ठेव पण आधी तुझी काळजी घे,’ असा सल्ला दिला.


bottom of page