top of page

लाडकी बहीण योजनेबद्द्ल आले नवे अपडेट; काय आहे सरकारचा नवा निर्णय ?

महिला सक्षमीकरणाकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana ) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना आणखी दिलासा दिला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.




मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत होती. त्यानुसार अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले. त्यामुळे कोट्यवधी महिला ऑगस्ट महिन्यात पात्र ठरल्या आहेत. या महिन्यात पात्र ठरलेल्या काही महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अडचणींमुळे काही महिलांनी हे अर्ज भरलेले नाहीत. राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून राज्य सरकारने आता याचा कालावधी वाढवला आहे. आता सप्टेंबर महिन्यातही या योजनेसाठी नावनोंदणी करता येणार आहे.



bottom of page