top of page

VIDEO: बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

बिबट्याने भर वस्तीत रात्री प्रवेश करून अंगणात बसलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना मुंगसरे ( जि. नाशिक) गावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

Video पाहा :

दरम्यान, नाशिकचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. बिबट्याचा वावर वाढला असून गावातील लोकांनी घरातच थांबावं आणि सतर्क राहावं, असं आवाहन गर्ग यांनी केले.


bottom of page