top of page
Writer's pictureMahannewsonline

लॉकडाऊनबाबत आज काय निर्णय होणार?

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत राज्यात तीन आठवड्याच्या लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन लावण्यात आला तर मग नियमावली कशी असेल , याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते.

राज्य सरकारने दिवसा जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू आणि शनिवार-रविवारी वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आला आहे. तरीदेखील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्याचे संकेत काल (शनिवारी) दिलेत. त्यामुळे आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.


bottom of page