top of page
Writer's pictureMahannewsonline

जास्त तास काम करणं आरोग्यासाठी धोकादायक; WHO च्या अभ्यासातून धक्कादायक माहिती

जास्त तास काम करणं अनेकांसाठी जीवघेणं ठरत असून वर्षाला हजारोंच्या संख्येने होणारे मृत्यू चिंतेची बाब असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. कामाच्या जास्त तासांमुळे होणाऱ्या मृत्यूशी संबंधित जागतिक अभ्यासात ही माहिती उघड झाली आहे. अभ्यासानुसार, २०१६ मध्ये जास्त तास काम केल्यामुळे ७ लाख ४५ हजार लोकांचा स्ट्रोक तसंच ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला. आठवड्याला ५५ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेतील आरोग्य विभागाच्या प्रमुख मारिया यांनी सांगितलं आहे. यासंबधी यॊग्य पावलं उचलली जावीत, तसंच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा काळजी घेतली जावी यासाठी आम्ही ही माहिती प्रसिद्ध करत आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेकडून संयुक्तपणे करण्यात आलेल्या अभ्यासात सर्वाधिक मृत्यू होणाऱ्यांमध्ये पुरुष असून हे प्रमाण ७२ टक्के आहे. त्यातही मध्यम किंवा वयस्कर जास्त आहेत. यामध्ये चीन, जपान, ऑस्ट्रेलियामधील नागरिकांचा समावेश आहे.


अभ्यासानुसार, १९४ देशांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार आठवड्याला ३५ ते ४० तास काम करण्याच्या तुलनेत ५५ किंवा त्याहून जास्त काम केल्याने स्ट्रोकची शक्यता ३५ टक्के तर ह्रदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होण्याची शक्यता १७ टक्क्यांनी वाढते. हा अभ्यास २००० ते २०१६ दरम्यान करण्यात आलेला असून कोरोना काळाचा समावेश नाही. कोरोनामुळे घरुन काम करण्याचं प्रमाण वाढत असून किमान नऊ टक्के लोक जास्त तास काम करत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.


आठवड्याला 55 किंवा त्याहून अधिक तास काम केले, तर स्ट्रोकचा धोका 35 टक्के अधिक आहे, तर हृदयरोगाचा धोका 17 टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच आठवड्याचे सहा दिवस दररोज नऊ तास काम करणारे कर्मचारी (आठवड्याला अंदाजे 54 तास) सीमारेषेवर आहेत. ही तुलना आठवड्याला 35 ते 40 काम करणाऱ्या व्यक्तींसोबत आहे


bottom of page