top of page

सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत पोहोचली २ हजार ३५५ वर

महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असतानाच महिन्याच्या सुरूवातीलाच तेल कंपन्यांनी व्यावसायिक LPG गॅसच्या किंमतीत १०२.५० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची दिल्लीतील नवीन किंमत आता २ हजार ३५५.५० रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत २ हजार २५३ रुपये होती.

५ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या ६५५ रुपये आहे. महिनाभरापूर्वी १ एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.


bottom of page