top of page

घरगुती गॅस सिलेंडर महागला; जाणून घ्या नवे दर

गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ करण्यात आली. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली. त्यामुळं आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे.

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. मुंबईत एलपीजीसाठी आता ८९९ रुपये ५ पैशांच्या ऐवजी ९४९ रुपये ०५ पैसे मोजावे लागणार आहेत. चेन्नईत हा दर ९६५ रुपये ५ पैशांवर आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर वाढून ९७६ रुपये झाला आहे. याआधी हा दर ९२६ रुपये होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत दर ९३८ वरुन थेट ९८७ रुपये ५ पैसे झाला आहे.आज मंगळवारपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

पेट्रोल ८४ तर डिझेल ८३ पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज म्हणजेच २२ मार्च २०२२ ला पेट्रोलचा दर ९५ रुपये ४१ पैशांवरुन वाढत प्रतिलीटर ९६ रुपये २१ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ८६ रुपये ६७ पैशांवरुन ८७ रुपये ४७ पैशांवर पोहोचला आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या चार महिन्यांपासून ९४ रुपये १४ पैसे होता.




bottom of page