top of page

पक्षाकडून उमेदवारी जाहीर; तरीही निवडणुकीतून माघार: काय आहे नेमकं कारण ?

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. परंतु पक्षाकडून उमेदवारी मिळूनही एका उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रफुल्ल लोढा ( Praful Lodha ) यांना जळगावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्यानंतर मी निवडून येऊ शकत नाही ही वस्तूस्थिती असल्याने मला दिलेली उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती लोढा यांनी दिली. मी कोणत्याही दबावाला बळी न पडता माझी ही माघार आहे. याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. असे प्रफुल्ल लोढा यांनी सांगितले,




जळगाव लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्यास आपण महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना पाठिंबा देऊ असेही ते म्हणले. यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ, महाविकास आघाडीचे करण पवार यांच्यात सरळ लढत होत आहे.




bottom of page