top of page
Writer's pictureMahannewsonline

7 तासात 7 हजार किलोची महामिसळ... झाली गिनीज बुकात नोंद

पुणे : मिसळ म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पुण्याची मिसळ चांगली की कोल्हापूरची किंवा नाशिकची.... यावर खवय्यांमध्ये नेहमी चर्चा रंगत असते. अशात रविवारी, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या 30 सहकाऱ्यांच्या सहाय्याने 7 तासात तब्बल 7 हजार किलो मिसळ बनविण्याचा एक नवा विक्रम केला आहे. या "महामिसळ"ची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय आहे. तसेच युनिक बेंचमार्किंग वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या 7 हजार किलोच्या अनोख्या पुणेरी मिसळची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटनं ''विष्णू महामिसळ 2021'' या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी 7 तासात तब्बल 7 हजार किलो मिसळ बनवण्यात आली. ही मिसळ तयार करण्यासाठी 30 जणांचा सहभाग होता. यासाठी मटकी 1500 किलो, कांदा 500 किलो, आले 125 किलो, लसूण 125 किलो, तेल 350 किलो, कांदा लसूण मसाला 180 किलो, लाल तिखट मिरची पावडर 50 किलो, हळद 50 किलो, मीठ 25 किलो, खोबरे 115 किलो, तेज पान 15 किलो, मिक्स फरसाण 1200 किलो, पाणी 4500 लिटर, कोथंबीर 50 किलो असे साहित्य वापरण्यात आले. ही मिसळ 300 एनजीओमार्फत 30 हजार गरजू लोकांना वाटप करण्यात आली.


सर्वात मोठा पराठा, 5000 किलोची खिचडी, कबाब अश्या विक्रमानंतर आज शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल 7 हजार किलोची महा मिसळ बनविण्यातआली आहे. याआधी हजारो लोकांच्या उपस्थितीत विश्व विक्रम तयार करण्यात आले. पण हा विश्वविक्रम कोरोनाच्या नियमांचं पालन करून तयार करण्यात आल्याने एक वेगळंच अनुभव होता', अशी भावना यावेळी शेफ विष्णू मनोहर यांनी यावेळी व्यक्त केली.

bottom of page