top of page
Writer's pictureMahannewsonline

महाविकास आघाडी भाजपला देणार धक्का!

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. या विजयानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडून एकत्र पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून येतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आघाडीतील निवडून आलेल्या सदस्यांना करण्यात आले आहे. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज्यातील १०६ नगरपंचायतींमधील १८०२ जागा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तिन्ही पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.


काय म्हंटले आहे पत्रकात ?

'महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्याच्या हिताच्या व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून आज सुयोग्यरित्या महाराष्ट्रातील जनतेला समान विकास कार्यक्रम अंतर्गत सक्षमरित्या कार्य करीत आहेत.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आज आपण सर्वजण पहिल्यांदाच १०६ नगरपंचायतीच्या व भंडारा गोंदिया जिल्हा परिषद तसेत १५ नगर पंचायत समित्या निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरघोस यश जनतेने दिले' असं म्हणत महाविकास आघाडीने राज्यातील जनतेचे आभार मानले.

तसंच, नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश आपल्याला कायम ठेवायचे आहे व जनतेने दाखवलेल्या विश्वास हा पुन्हा त्यांना समान विकास कार्यक्रमानुसार, विकास स्वरूपात पुन्हा द्यावयायचा असेल तर आपल्याला प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होणे देखील अत्यावश्यक आहे. तरी आपण सर्वांनी याकरिता स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावेत व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे निवडून येतील प्रयत्न करावेत' असे आवाहन महाविकास आघाडीने आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.


bottom of page