top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचं कार्यालय पेटवलं …

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला इशारा , शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास …

मागील दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले.

आगीची माहिती मिळताच प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये काही कागदपत्रं जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, शेतीला सलग दहा तास दिवसा वीजपुरवठा करावा या मागणीसाठी बुधवारी (२३ फेब्रुवारी) सलग दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरमधील महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं. यावेळी राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. शेतकऱ्यांची वाटोळे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू. राज्यातील जनतेला लुबाडायचे व त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करा असंही शेट्टी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हणाले.


bottom of page