top of page
Writer's pictureMahannewsonline

VIDEO - ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदारानं केलं स्टींग ऑपरेशन...

पोलिसांच्या वसुलीचा केला पर्दाफाश

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाट बंद असतांना देखील ट्रकचालकांकडून ५०० ते १००० रुपये घेवून पोलिसांकडून गाड्या सोडल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणला आहे. आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालवत आणून या प्रकाराचे स्ट्रिंग ऑपरेशन केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खात्री करण्यासाठी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाने वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. या स्ट्रिंग ऑपरेशनचे काही व्हिडीओ चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलेत.

आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. त्यानतंर मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला.

या घटनेनतंर आमदार चव्हाण यांनी या ठिकाणी असलेल्या ट्रकचालकांची चर्चा केली. त्या चालकांनी या ठिकाणी नेहमी वसुली केली जात असल्याचे सांगितले.




bottom of page