top of page
Writer's pictureMahannewsonline

कुस्तीपटू सुशील कुमार नंतर आता सुवर्णपदक विजेत्या "या' कुस्तीपटूला अटक

दरोडा आणि अवैध दारुच्या विक्रीप्रकरणी झाली अटक

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्याची घटना ताजी असतानाच आणखीन एका कुस्तीपटूच्या अटकेने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीयस्तरावरील माजी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू मनजित याला दरोडा आणि अवैध दारुच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी गुरुवारी दिली.


कौशल गँगचा सक्रिय सदस्य मनजित याला २४ मे रोजी नजफगड भागातून विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि चोरी केलेले मोबाइल जप्त केले. मनजीतविरोधात शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती द्वारकाचे डीसीपी संतोषकुमार मीना यांनी दिली.


२०१०मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या ५५ किलो वजनी गटात मनजितने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर तो चुकीच्या मार्गी लागला. २०१२मध्ये मनजितने मित्राच्या मदतीने हरयाणा येथून एक कार चोरी केली होती. २०१३मध्ये त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. तर त्याला पुन्हा २०१९मध्ये अटक करण्यात आली. दरम्यान मनजित भोंदसी कारागृहात कौशल गँगच्या संपर्कात आला आणि त्यांचाच एक भाग झाला. २०२१च्या फेब्रुवारीमध्ये तुरूंगातून सुटल्यानंतर मनजीतने हरयाणा येथून दिल्लीला अवैध दारू विक्री करण्यास सुरवात केली.


bottom of page