top of page
Writer's pictureMahannewsonline

'मनसे' एसटी कर्मचाऱ्यांसोबत; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मनसे होणार सहभागी

राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे विभागातील सर्वाधिक आगार बंद असून सोमवारी मुंबई हायकोर्टात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सुनावणी देखील आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बाळा नांदगांवकर यांनी पत्रक काढून मनसैनिकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

मनसेच्या पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे

"एसटी कर्मचारी-कामगार जगला तरच एसटी जगेल" हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करण्यात येते की राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आपल्या सर्वांना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.


राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार आहे.मनसेच्या सहभागामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


bottom of page