top of page
Writer's pictureMahannewsonline

हो आहे मी संयमी, पण आजपासून तो संयम…

१६ जूनला पहिला मोर्चा काढणार

“आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा संभाजीराजे भोसले यांनी यावेळी केली आहे.

खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाविषयी ६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनापर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू , असा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले रायगडावरून काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.


शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. तुम्ही आजपर्यंत संभाजी छत्रपतींना संयमी बघितलं आहे. हो आहे मी संयमी. पण आजपासून तो संयम मी बाजूला ठेवला आहे. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढणार असून कोरोनाचं संकट ओसरल्यानंतर देखील पावलं उचलली गेली नाहीत, तर लाँगमार्च काढला जाईल, यामध्ये लाखो लोक सहभागी होतील, असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी यावेळी दिला. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवालात काही शिफारसी केल्या होत्या, मी पत्रकार परिषद घेऊन ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्याच समितीने सांगितल्या. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, समाजाला वेठीस धरु नये, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.


bottom of page