top of page
Writer's pictureMahannewsonline

मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण- संभाजीराजे

संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. यावेळी आक्रमक पवित्रा घेत मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे मराठा आरक्षणाबद्दल कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती, मात्र आता आपण मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, “मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा असल्याने मराठा आरक्षणासाठी लढत नाही. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो, पण आता मी उद्विग्न झालो आहे. मला टोकाची भूमिका न घेण्यास सांगण्यात आलं. पण सरकार या संदर्भात काहीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे माझी भूमिका आता मी बदलत आहे. येत्या २६ फेब्रुवारीला मी स्वतः मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.


bottom of page