top of page
Writer's pictureMahannewsonline

निवासी डॉक्टर आजपासून संपावर; राज्यातील रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई: शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला आज पासून सुरूवात झाली असून राज्यातील 5 हजारांहून अधिक डाॅक्टर्स यात सहभागी झाले आहेत. या संपामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवासी डॉक्टर गेले जवळपास दोन वर्ष कोरोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने केलेली नाही. त्यामुळे अखेर मार्डने आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू असतील असे मार्डने स्पष्ट केले आहे.


bottom of page