top of page
Writer's pictureMahannewsonline

…तर मास्क घालण्याची गरज नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरु असून यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांनी आता मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचं बायडन यांनी सांगितलं आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) यासंबंधी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली असून त्याचा उल्लेख करत त्यांनी ही माहिती दिली.


काही तासांपूर्वीच सीडीसीने आपण पूर्ण लसीकरण केलेल्या लोकांना आता मास्क घालण्याची गरज नसल्याची शिफारस केली आहे. ही शिफारस खरी असून घरात किवा घराबाहेर दोन्हीकडे लागू आहे. मला वाटतं हा मोलाचा टप्पा आहे. एक मोठा दिवस असून नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण केल्यानेच हे यश संपादन करणं शक्य झालं असल्याचं बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना सांगितलं.


सीडीसीने नव्याने मार्गदर्शक तत्वं जाहीर केली असून लसीकरण पूर्ण झालेल्यांनी मास्क घालण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. मात्र यावेळी यावेळी ज्यांचं अद्यापही लसीकरण झाले नाही त्यांनी मास्क घालण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे.


bottom of page