top of page
Writer's pictureMahannewsonline

ममता बॅनर्जी रुग्णालयात; अभिषेक बॅनर्जी यांचा भाजपाला इशारा

पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरले असून भाजपाने सारा जोर लावलाय. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी एकट्या तृणमूलसाठी प्रचार करत आहेत. या दरम्यान बुधवारी निवडणूक प्रचारादरम्यान ४-५ जणांनी आपल्याला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाली असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. असं असतानाच आता ममता यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममतांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिलाय.

अभिषेक यांनी ममतांचा रुग्णलयामधील फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ममता रुग्णालयातील बेडवर असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर केल्याचं दिसत आहे. हा फोटो ट्विट करताना अभिषेक यांनी, “भाजपाने तयार रहावे. रविवारी २ मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा,” असं म्हणत अभिषेक यांनी भाजपला इशारा दिला आहे.


ममतांच्या पायाला, मानेला दुखापत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकात्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायाच्या घोट्याला आणि मानेला दुखापत झाली आहे, तसंच त्यांच्या उजव्या खांद्याला, हाताच्या कोपरालाही दुखापत झाली आहे. त्यांना छातीत दुखत आहे आणि श्वास घेण्यासही त्रास होतोय. त्यांना ४८ तास देखरेखी खाली ठेवण्यात येत आहे, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या  डॉक्टर एम. बंडोपाध्याय यांनी सांगितलं.

दरम्यान, ममतांवरील या कथित हल्ल्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी रात्री रुग्णालयात जाऊन ममता यांची विचारपूस केली.


bottom of page