top of page
Writer's pictureMahannewsonline

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला डोमिनिका कोर्टाची स्थगिती

पंजाब नॅशनल बँकेच्या १३५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला आज मोठा धक्का बसला आहे. भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व घेऊन स्थायिक झालेल्या मेहुल चोक्सीला नुकतीच डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. यानंतर मेहुल चोक्सीचं थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु असताना डोमिनिका कोर्टाने मात्र प्रत्यार्पणावर स्थगिती आणली आहे.

बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. यादरम्यान अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी मेहुल चोक्सीचं थेट भारतात प्रत्यार्पण करा असं डोमिनिकाला सांगितलं आहे. परंतु, कोर्टाने पुढील आदेशापर्यंत मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण केलं जाऊ नये असा आदेश दिला असून मेहुल चोक्सीला कायदेशीर मदत आणि वकिलांशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ मे रोजी होणार आहे.


bottom of page