top of page
Writer's pictureMahannewsonline

शासकीय कामात अडथळा; खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी काल (1 जून) कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे इम्तियाज जलील यांच्यासह 25 दुकानदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत. या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. लाॅकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांच्या सील केलेल्या दुकानांवरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी गेलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी कामगार उपायुक्तांशी अरेरावी केली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. कर्तव्याचा भाग म्हणून महिला पोलिस चित्रीकरण करत असताना खासदारांनी हाताला धक्का देऊन त्यांचा माेबाइल खाली पाडला, त्यांना उद्धटपणे वागणूकही दिली. याप्रकरणी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी स्वत: क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



bottom of page