मनोहर जगताप यांची पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक पदी निवड
नाशिक- महाराष्ट्र शासन गृह विभाग नागरी संरक्षण दलाच्या पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक पदी मनोहर जगताप यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा नियंत्रक यांच्या मान्यतेने नागरी संरक्षण उपनियंत्रक पो.रा.सांगडे यांनी मनोहर जगताप यांना नियुक्ती पत्र दिले.
यापूर्वी मानसेवी निदेशक व चौकी क्षेत्ररक्षक पदांवर त्यांनी कार्य केले आहे. या विभाग अंतर्गत पंचवटी, आडगाव,म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्द समाविष्ट आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सहाय्यक उपनियंत्रक अतुल जागताप, देवेंद्र बावस्कर व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे