top of page

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्यावतीने मान्यवरांचा गौरव

मराठी भाषा दिनानिमित्त मलबार हील विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना तर्फे २७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेच्या वतीने व्ही. पी. रोड पोलीस, डी. बी. मार्ग पोलीस स्टेशन, ताडदेव पोलीस स्टेशन, गावदेवी पोलीस स्टेशन, मलबार हिल पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांचा कुसुमाग्रजांचे पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अग्निशामक दल गावदेवी, बीएमसी डी वॉर्ड सहआयुक्त, डीन नायर हॉस्पिटल, डीन डेंटल विभाग, बेस्ट ऑफिस ताडदेव यांचाही कुसुमाग्रजांचे पुस्तक आणि स्मृतिचिन्ह भेट गौरव करण्यात आला.


यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीधर जगताप , मलबार हिल विधानसभेचे विभाग अध्यक्ष निलेश शिरधनकर, श्रीमती आशा शाह, दिनेश पुंडे, मुकेश भालेराव, राहुल परदेशी, आदित्य तिर्लोटकर, सुरेश आंगणे (बाबू), परेश मोघे, रवींद्र शिंदे, विराज नेरुळकर, अंकुर लाड, सौ अरुणाताई मारु यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते


bottom of page