top of page
Writer's pictureMahannewsonline

"मोर्चे चालू, यात्रा चालू मग मंदीर बंद का ? …"; मनसेचे घंटानाद आंदोलन

पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती.त्यानंतर पुण्यात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केलं.

राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरं खुली न केल्यास, आम्ही मनसेच मंदिरं उघडेल असा इशारा मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावेळी मंदिरातील देव बोले, उघड दार उद्धवाआता उघड दार उद्धवा’, ‘मोर्चे चालू यात्रा चालू मग मंदीर बंद का ?’,’ उद्धवा अजब तुझे सरकार…!’, ‘आई राजा उदो उदो बिघाडी सरकारला उठव…’,असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


दरम्यान, नाशिक मधील काळाराम मंदिरासमोर मनसेकडून आंदोलन करण्यात आले.


bottom of page