top of page
Writer's pictureMahannewsonline

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( मनसे) ने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखीच जड झाले आहे. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदे घेत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.


यापूर्वीच्या पोट निवडणुकीत मनसेने निधन पावलेल्या सदस्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला सहकार्य केले आहे. त्यानुसार पंढरपूरच्या निवडणुकीत ही भगिरथ भालकेंना पाठिंबा दिल्याचे धोत्रे यांनी स्पष्ट केले. उद्यापासून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात समांतर प्रचार यंत्रणा राबवण्यात येणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले.

bottom of page