top of page
Writer's pictureMahannewsonline

पंतप्रधान मोदी हे भगवान शंकराचा अवतार; त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचविले

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा मंत्र्याचं वक्तव्य

महाशिवरात्रीनिमित्त हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील राम मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे वक्तव्य शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी केले आहे. “मोदींना भगवान शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. मोदी हे भगवान शंकाराचे रुप आहे. त्यामुळेच त्यांनी देशाला कोरोनासारख्या संकटापासून वाचवलं,” असंही भारद्वाज म्हणाले. हिमाचल प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांचा हा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाला आहे.


२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान मोदींनी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळामध्ये ते गुहेमध्ये ध्यान करत होते. मोदींना भगवान शंकराचे वरदान मिळालं आहे. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय मिळाला याचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी स्मरण केलं पाहिजे, असंही भारद्वाज म्हणाले.


जगभरामध्ये कोरोनाची लस बनवणाऱ्या सर्व देशांमध्ये भारताने आघाडी घेतली असल्याचं सांगितलं. भारत हा एकमेव असा देश आहे ज्याने दोन लसी निर्माण केल्या आहेत. आता जगभरातील इतर देश भारताप्रमाणे दोन लसी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून भारताकडून लसीसंदर्भात मदत मागत आहेत, असंही भारद्वाज यांनी म्हटलं आहे. लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक मोठी झालीय. त्यामुळेच ते शिवाचा अवतार आहेत, असा दावाही भारद्वाज यांनी केलाय. इतकचं नाही तर मोदींनी कोरोनापासून देशाला वाचवलं हे सांगताना भारतामध्ये कोरोना मृत्यूदर कमी असण्याचे श्रेयही भारद्वाज यांनी मोदींनाच दिलं आहे.

bottom of page