top of page

Video: …अन् पंतप्रधान मोदी यांनाही आवरला नाही ढोलवादनाचा मोह!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशा पथक ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनाही ढोलवादनाचा मोह टाळता आला नाही. या ढोल पथकामधील तरुणांचा उत्साह आणि वादन पाहून मोदी यांनी ढोल-ताशा पथकातील एका तरुणाजवळ जात स्वत: ढोल वाद्य वाजवत आनंद घेतला. तसेच या पथकातील कलावंतांशी संवादही मोदी यांनी साधला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “पंतप्रधान मोदींचं नागपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

खापरी येथे मेट्रो मार्गिकेच्या उद्गाटनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान ‘समृद्धी’च्या वायफळ टोल नाक्याजवळ असलेल्या कार्यक्रम स्थळी आले. तेथे त्यांच्या स्वागतासाठी ढोलपथक तैनात होतं. या ढोल पथकामधील तरुणांचा उत्साह आणि वादन पाहून मोदींनीही ढोलवादन केलं. या ढोल-ताशा पथकातील एका तरुणाजवळ जात मोदींनी स्वत: ढोलवादन केलं.


bottom of page