top of page
Writer's pictureMahannewsonline

जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान मोदी ठरले सर्वात लोकप्रिय नेते

पेट्रोल, गॅस दरवाढ, महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला असून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे. मोदींच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आज ही कायम असल्याचे दिसून येत आहे. आता, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 5 व्या स्थानावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात मोदींना ७० टक्के गुणांकन मिळालंय. दर आठवड्याला या सर्वेक्षणाचा डेटा अपडेट केला जातो.

पंतप्रधान मोदींनी मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना मागे टाकले आहे.

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रौढांमध्ये सर्वात कमी असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय. भारतात सर्वेक्षण केलेल्या प्रौढांपैकी २५ टक्के लोकांनी मोदींना नाकारलंय. मॉर्निंग कन्सल्टच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण केलेल्या तेरा जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. ऑगस्ट २०१९ मध्ये मोदींचे गुणांकन तब्बल ८२ टक्क्यांवर होते. पण गेल्या दोन वर्षात त्यात घट झाल्याचं पाहायला मिळालंय.


bottom of page