top of page
Writer's pictureMahannewsonline

भाजपच्या कार्यकर्त्याने पुण्यात उभारलं नरेंद्र मोदी यांचं मंदिर; PMO कडून फोन आला अन्…

पुणे : पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं होतं. औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आल्यानंतर हे मंदिर हटविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे.

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिर’ मंदिर उभारले होते. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च आलेला. १५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावली होती. तसंच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.


bottom of page