मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ३ ते ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; असे काय घडले ? वाचा...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ३ ते ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खोपोली ( जि. रायगड ) हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर पलटी झाला. या अपघातामुळे टॅंकरमधील केमिकल मार्गावर सांडल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला.
अपघाताची माहीती मिळताच खंडाळा, दस्तुरी महामार्ग वाहतुक पोलिस, आयआरबीचे कर्मचारी, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पुण्याकडे येणारी वाहतूक थांबविल्याने वाहनांच्या जवळपास ३ ते ४ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. तर मुंबईकडे येणारी वाहतूकही विस्कळीत झाली.