top of page
Writer's pictureMahannewsonline

मुंबईत इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू

मुंबई : बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडमध्ये एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं.


bottom of page