top of page
Writer's pictureMahannewsonline

तौक्ते चक्रीवादळ: दोन जहाजं भरकटली; ४१० जण अडकले

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चांगलाच तडाखा बसला असून मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजं भरकटल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका जहाजावर २७३, तर दुसऱ्या जहाजावर १३७ जण असे ४१० जण अडकले आहेत.. या जहाजांच्या मदतीला आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौते चक्रीवादळामुळे भरकटली आहे. या बोटीवर २७३ जण असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अनेकजण हे कामगार आणि इंजिनियर्स असल्याचे समजते. बोटीने नांगर टाकलेल्या नसल्याने ती वादळामुळे आलेल्या वाऱ्यासोबत वाहत गेली. ही बोट बंदरामधील तसेच समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

तसेच दुसरीकडे मुंबईच्या समुद्रामध्येच ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आणखीन एक मोठं जहाज भरकटलं असून त्यावर १३७ जण आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ नॉर्टीकल मैल अंतरावर असणारं हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका मदतासाठी पाठवली आहे.


bottom of page