top of page
Writer's pictureMahannewsonline

आम्हाला आदेश द्यायला लावू नका; मुंबई हायकोर्टाची सूचना

आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक असून स्थिती अद्यापही गंभीर आहे. पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे लॉकडाउन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने यावेळी म्हटलं. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा मुंबई हायकोर्ट घेत असून सुनावणीदरम्यान ही सूचना करण्यात आली.

पुण्यात १.४ लाख अॅक्टिव्ह केसेस असून अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितलं. कोर्टाने यावेळी पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवलं, जर मुंबई मॉडेलंच सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे असा सल्ला दिला.


दरम्यान पुण्यातील स्थितीवर बोलताना कोर्टाने तुमचे पालिका आयुक्त मुंबई पालिका आयुक्तांशी का बोलत नाहीत? अशी विचारणा पुणे पालिकेच्या वकिलांना केली. “तुमच्याकडे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट आहे. तुमच्याकडील पायाभूत सुविधा मुंबईसारख्या चांगल्या नसतील. पण काहीतरी केलं पाहिजे,” असं कोर्टाने यावेळी खडसावलं.


bottom of page