१३ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने केला बलात्कार
मुंबई : एका १३ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. ती मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अँटॉप हिल पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपीला अटक केली आहे.
मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशीही माहिती पोलिसांनी दिली. आरोपी तरूण हा पीडितेच्या घराशेजारी राहतो. त्याला अटक करण्यात आली असून आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.