top of page
Writer's pictureMahannewsonline

कायरन पोलार्डच्या वादळी खेळीने चेन्नई पराभूत

चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटनने यांनी ६ षटकात बिनबाद ५८ धावा केल्या. त्यानंतर मुंबईचे ३ फलदांज स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची अवस्था 10 षटकात 3 बाद 81 अशी झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या कायरन पोलार्ड याने कोणताही दबाव न घेता 15 व्या षटकात शार्दुल ठाकूरला चौकार ठोकत 17चेंडूत अर्धशतक साकारले.

यंदाच्या आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. 15 षटकात मुंबईने 3 बाद 153 धावा फलकावर लावल्या. 17 व्या षटकात कृणाल पंड्याला बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने 2 षटकात मुंबईला विजयासाठी 31 धावांची गरज असताना दोन षटकार ठोकले. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीवर हल्ला चढवत आव्हान पूर्ण केले. पोलार्डने 34 चेंडूत नाबाद 87 धावा करत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. पोलार्डने आपल्या 87 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 8 षटकार ठोकले. पोलार्डला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिकल्यानंतर मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस, मोईन अली आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने २० षटकात चेन्नईने 4 बाद 218 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कायरन पोलार्डने वादळी खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला.


bottom of page