top of page
Writer's pictureMahannewsonline

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना आयुक्तांचे आदेश

मुंबई : आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे. दोन तीन दिवसांपासून बाजारपेठांमधून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता मुंबईत पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. यानुसार, त्यांना पोलीस गणवेशात गणेश मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ६ सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गणवेशावर नाचू नये, आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच, असे करताना कोणता पोलीस अधिकारी वा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे”, असेही ते म्हणाले.


Recent Posts

See All
bottom of page